काँग्रेस उमेदवारांचे बंधू रवी शेंडे द्वारा देशमुख यांचा जीव घेण्याचा प्रयत्न.

काँग्रेस उमेदवारांचे बंधू रवी शेंडे द्वारा देशमुख यांचा जीव घेण्याचा प्रयत्न.

वर्धा ( मंगेश चोरे द्वारा) काँग्रेसचे उमेदवार शेखर शेंडे यांचे मोठे बंधू आणि त्यांची जुनी पाकडी गॅंग पूर्ववत सक्रिय झाली आहे. या गॅंगवारी मुळेच सातत्याने पराजित होत असलेले शेखर शेंडे यावेळी सुद्धा आता निवडून येतील की नाही. शंका उत्पन्न होऊ लागली आहे. काल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्ही नाईन या चॅनल द्वारा लोक महाविद्यालयाच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे काँग्रेसचे अन्य पक्षाचे अनेक नेते मंडळी उपस्थित होती त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार शेखर शेंडे यांचे मोठे बंधू रवी शेंडे आणि त्यांची टोळी ही सुद्धा उपस्थित होती. कार्यक्रमादरम्यान एकमेकांवर ताशेरे ओढत असताना शेंडे यांचे आतील गुंड जागृत झाले. आरोप प्रत्यारोप सुरू असताना राग अनावर झाल्याने कार्यक्रम संपताच रवी प्रमोद शेंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रीधर श्रीराम पंत देशमुख यांना मारहाण करून गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वर्धा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून पोलिसांनी विविध गुन्हे नोंद करून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. उमेदवारी मिळतात शेंडे परिवाराची गुंडगिरी वाढली असल्याचे सर्वत्र शहरात चर्चेत आहे.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles