
सेनेचा अपमान करणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
सेनेचा अपमान करणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
हिंगणघाट : संसदेत काही विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून वारंवार भारतीय सेनेचा अपमान करणारे वक्तव्य करण्यात येत आहेत. हे वक्तव्य केवळ अपमानकारक नसून, सेनेचे मनोबल खच्चीकरण करणारे आहेत. अशा वक्तव्यांमुळे देशाच्या सुरक्षेवर व संयमावर परिणाम होण्याची शक्यता आहे. याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आज उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात, सेनेचा अपमान करणाऱ्या नेत्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली. या प्रसंगी अटल बिहारी पांडेय,किरण उपाध्याय महेश राऊत अमोल अतकर अनिल कावळे महेश हटवार भगवान उपाध्याय सनी उपाध्याय, अमनकुमार मिश्रा प्रदीप त्रिपाठी कृष्णा हथगले निखिल मसराम आश्विन साहू चेतन लढ्ढा मुन्ना यादव आणि पंकज यादव हे कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, “भारतीय सेना ही आपले संरक्षण करणारी अभिमानास्पद संस्था आहे. तिच्या विरोधात बोलणं म्हणजे देशद्रोहच असून, अशा लोकांवर तातडीने कठोर कारवाई व्हावी.”